कजगाव (भडगाव ) प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव यांच्या वतीने कजगाव येथे जलद ताप सव्हेक्षण करण्यात आले.कजगाव येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील व डाँ.स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक तयार करुन घरोघरी जाऊन सव्हेक्षण करण्यात आले.
सदर प्रसंगी आरोग्यसहाय्यक श्रीकांत मराठे,रमेश राठोड,आरोग्यसहाय्यिका मथुरा जाधव,आरोग्यसेवक राजेश खैरनार,रविंद्र सुर्यवंशी,विकास चव्हाण,संदिप पाटील,संजय सोनार कळवाडीकर,आरोग्यसेविका कांता मोरे व कजगाव येथील सर्व आशास्वयंसेविका हजर होत्या.सदर पथकाने घरोघरी जाऊन सव्हेक्षण करुन गावात अँबेटींग करुन डेंग्यु आजाराविषयी जनजागृती केली.गोंडगाव येथील आरोग्यसेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की डेंग्यु हा आजार एडीस इजिप्टाय डासांपासुन होतो.डेंग्यु ह्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव मार्ग आहे.नागरिंकानी कोरडा दिवस पाळणे,पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवणे,परिसरातील पाण्याची डबकी बुजविणे किंवा त्यांत आँईल टाकणे.नागरिकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय डासांची उत्पत्ती रोखता येणार नाही.म्हणुन नागरिकांनी काळजी घ्यावी.