नागरिकत्व विधेयक आज जळगावात विविध संघटनांचे आंदोलन

0

जळगाव  – नागरिकतत्व विधेयकाचा विरोधात व समर्थनात जळगावात आज शुक्रवारी दि. 20 डिसेंबर रोजी विविध संघटनाचा वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आदोलनात विधेयकाचा विरोध करण्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मंच तसेच बहुजन क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थीचा वतीने विधेयकांचा समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  दुपारी 2 ते संध्या 5.30 पर्यन्त धरणे आदोलन केले जाणार  आहे.यावेळी धार्मिक पाठिंबा म्हणून  जमाते इस्लामी,जमीयत उलेमा,एस आई ओ, एम्स, वहिदत,तंजीम  ए उलेमा कुल जमाती यांच्या सहभाग राहणार आहे तसेच सामाजिक.पाठिंबा म्हणून मौलाना आजाद विचार मंच,अलफैज़ फॉउंडेशन,अमन एजुकेशन,अमन फॉउंडेशन, जन नायक,रौशनी फॉउडेशन,बाईस, हॉकर्स यूनियन,मौलाना अबुल कलाम आजाद,नॅशनल स्पोर्ट्स,लकी फॉउंडेशन, आयडियल,मीर शुकरुल्ला, ईशान फाउंडेशन यांच्या सहकार्य राहणार आहे. तर बिरादरी तर्फे मणियार मुलतानी मेमन बागवान,खटिक सिकलगर,पटेल देशमुख देशपाडे,पिंजारी कुरेशी,शाह,पटवे,भिस्ती यांच्या सहकार्य आंदोलनात मोठ्या संख्येने असणार आहे.

देशभरातील सर्व छोट्या  मोठ्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी पुढे येऊन या लढ्याच नेतृत्व केले पाहिजे. असे आव्हान मुफ्ती अतीक मुफ्ती अफजल, मुफ्ती हारन, फारुक शेख, गफ्फार मालिक करीम सालार, डॉ अमान, बशीर बरहानी, जमील शेख, फिरोज मुलतानी जाकिर पठान,अलफैज पटेल, जमील देशपांडे, बामसेफचे अहिरे, सोनावणे व पदाधिकारी यानी केले आहे. तसेच यावेळी सविधान मानणारे उभे राहतील ज्याने जातीपातीचा विषय संपेल आणि त्याने हा लढा संविधान विरुद्ध भाजपा व संघ असा होईल त्यामुळे लढ्याला धार्मिक रंग लागणार नाही व मोठ्या प्रमाणात दबाव तयार होण्यास मदत होईल.तरी  जळगाव मुस्लिम मंच,बामसेफ,कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, एमआइएम,समाजवादी,री पब्लिक पक्ष,विविध धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रातील  समाजातील सर्व घटकानी यात सहभाग नोंदवून हजारो च्या संख्येने उपस्थीती द्यावी असे ही सांगण्यात आले.यावेळी दहा हजाराच्या वर नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.

बहुजन क्रांती मोर्चातर्फे

बहुजन क्रांती मोर्चातर्फे नागरिकतत्व व सी.ए.बीच्या विरोधतात  राष्ट्रीय स्तरावर 31 राज्यात, 550 जिल्ह्यात तीन टप्प्यांतील श्रृंखलाबद्ध आंदोलनांतर्गत धरणे व प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 ते 5 पर्यंत  केले जाणार आहे.  देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे. या सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक हे घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. या कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होवुन देशाच्या एकतेला बांधा निर्माण होणार आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडुन विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. असे  बहुजन क्रांती मोर्चा, जलगांव जिल्हा युनिट तर्फे उपस्थित राहण्याचे व मोर्चाला भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या जाहिर पाठिंबा असल्याचे आवाहन संघटनेचे राज्य महासचिव मोहन शिंदे ( पिंप्री खु ) यांनी केले आहे.

समर्थन सभा 

20 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मुळजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सर्व विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विधेयकांचा समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.