“नाईन्टीवाला भाऊ” सुरेश कदम रचित गाण्यास आ. किशोर पाटलांनी घातली साद

0

 भातखंडे (प्रतिनिधी) भातखंडे येथील रहिवासी कविवर्य, लेखक, गीत रचनाकार, प्राथमिक शिक्षक सुरेश पुंडलीक कदम यांनी नुकतेच “नाईन्टीवाला भाऊ” हे गीत रचले असून लवकरच ते सुरेश कदम नावाच्या यूट्यूब चैनलवर येत असून “नाईन्टीवाला भाऊ” या गाण्यातून मनोरंजनातून समाज प्रबोधन असा उद्देश असून हे गाणे खानदेशातील प्रसिद्ध गायक सचिन बागुल भातखंडेकर यांनी गायले असून संगीतबद्ध सुनील मोरे यांनी केले आहे.

सदरच्या गाण्याला अधिकाधिक लोकांनी पसंती देऊन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी भडगाव- पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मतदार संघातील तमाम जनतेस तसेच राज्यातील रसिकांनी ते गाणे अधिकाधिक पाहून लाईक करून सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कलाकारांचा यथोचित गौरव आमदार पाटील यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.