नांद्रा येथे चंदन चोरांचा पुन्हा हैदोस

0

पाचोरा | प्रतिनिधी       

नांद्रा ता. पाचोरा येथे स्वामी विष्णूदासजी महाराज यांच्या श्रीराम आश्रमला लागून असलेले शेतातील शेतकरी गोकुळ राजाराम पाटील, विनोद बाबुराव बाविस्कर, राजेंद्र महारु पाटील यांच्या बांधावरील शेतात दि. ११ सप्टेंबर रोजी मध्यराञी अज्ञात चोरटे यांनी मशिन वूड कटरच्या साह्याने जवळजवळ १० ते १२ वर्ष आयुष्य असलेले मोठे गर्क गाभा असलेला चंदनाचे उगवलेले बांधावरील १० ते १२ झाडांची कत्तल करुन त्यांना अपेक्षित मधला चँदनगाभा शोधून राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करुन धूम ठोकली आहे. या अगोदर ही प. पु. विष्णूदासजी महाराज यांच्या  श्रीराम आश्रमात मध्ये घूसून ४ ते ५ वर्षापूर्वी अशाच चंदनाची चोरी करण्यात आली होती तरी याघटनेची माहिती स्वामीजी विष्णूदासजी महाराज यांनी फोन वरून पोलिस पाटील किरण तावडे यांना दिल्यावर प्रथम प्रत्यक्ष शेतकरी सोबत जावून पाहणी पोलिस पाटील किरण तावडे, पकंज बाविस्कर, पञकार प्रा. यशवंत पवार, संजय जगन बाविस्कर, समाधान राजमल बाविस्कर, लिलाधर बाविस्कर यांनी केली व भविष्यात अशा चोरीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वामी विष्णूदासजी महाज व परिसरातील शेतकरीवर्ग व पशुपालक यांच्या कडून होत आहे.श्रीराम आश्रमला लागून असलेले शेतातील शेतकरी गोकुळ राजाराम पाटील, विनोद बाबुराव बाविस्कर, राजेंद्र महारु पाटील यांच्या बांधावरील शेतात दि. ११ सप्टेंबर रोजी मध्यराञी अज्ञात चोरटे यांनी मशिन वूड कटरच्या साह्याने जवळजवळ १० ते १२ वर्ष आयुष्य असलेले मोठे गर्क गाभा असलेला चंदनाचे उगवलेले बांधावरील १० ते १२ झाडांची कत्तल करुन त्यांना अपेक्षित मधला चँदनगाभा शोधून राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करुन धूम ठोकली आहे. या अगोदर ही प. पु. विष्णूदासजी महाराज यांच्या  श्रीराम आश्रमात मध्ये घूसून ४ ते ५ वर्षापूर्वी अशाच चंदनाची चोरी करण्यात आली होती तरी याघटनेची माहिती स्वामीजी विष्णूदासजी महाराज यांनी फोन वरून पोलिस पाटील किरण तावडे यांना दिल्यावर प्रथम प्रत्यक्ष शेतकरी सोबत जावून पाहणी पोलिस पाटील किरण तावडे, पकंज बाविस्कर, पञकार प्रा. यशवंत पवार, संजय जगन बाविस्कर, समाधान राजमल बाविस्कर, लिलाधर बाविस्कर यांनी केली व भविष्यात अशा चोरीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वामी विष्णूदासजी महाज व परिसरातील शेतकरीवर्ग व पशुपालक यांच्या कडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.