नांद्रा येथील भवानी मातेच्या मंदिरात चोरी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : नांद्रा येथील भवानी मातेच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून सुमारे २० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असुन घटनेबाबत पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी हे करीत आहे.

नांद्रा ता. पाचोरा नजिक लक्ष्मी अॅग्रो कंपनीने नव्यानेच बांधलेल्या भवानी मातेच्या मंदिरात दि. २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश केला. सर्व प्रथम चोरट्यांनी सी. सी. टी. व्ही. चे ५ हजार रुपये किंमतीचे डी. व्ही. आर., भवानी मातेच्या गळ्यातील २ ग्रॅम वजनाची ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रुपये किंमतीची दान पेटी व ५ हजार रुपये किंमतीची टी. व्ही. स्क्रीन (जुनी) असा सुमारे २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास करुन पसार झाले. दि. २६ रोजी सकाळी मंदिराचे देखभाल करणारे पुजारी यांना सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ लक्ष्मीकांत जयराम सुर्यवंशी यांना सांगितली. त्यांनी पाचोरा पोलिसात संपर्क केला असता पोलिसांनी पंचनामा करून लक्ष्मीकांत जयराम सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.