नांदेड येथे लाखोंची गावठी दारू जप्त ; महिलांकडून कारवाईचे स्वागत

0

नांदेड, ता.धरणगाव (प्रतिनीधी) : येथे गावठी दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती साह्ययक पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा मारून दोन लाखाची दारू नष्ट केली.

नांदेड येथे तापी नदीच्या किनारी गावठी दारू बनवून विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी छापा मारला असता २१टक्क्यांमधील एकूण ४ हजार २००लिटर हातभट्टी दारू मिळून आली होती पोलिसांनी तेथेच दारू चा टक्क्यां नष्ट केल्या. या प्रकरणी भरत कोळी, एकनाथ सैदाने, मुरलीधर सैदाने, सुरेश कोळी, छगन सैदाने, लहू सैदाने आसाराम सैदाने शांताराम सैदाने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई मुळे नांदेड परिसरातील अवैध धंदे करण्याचे धाबे दणादणले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत. या कारवाईचे स्वागत परिसरातील महिलानी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.