नांदेडमध्ये आढळला कोरोना पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

0

नांदेड ( प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती. जिल्ह्यात काल कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती होती. बुधवारी मात्र नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाचे वय 64 असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थितीही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती त्यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.

आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.

दि. २१ एप्रिल रोजी  तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी होते. नांदेड जिल्ह्यात काल पर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दिलासादायक परिस्थिती होती. काल पाठवलेले 66 संशयिताचे तपासणी अहवालातील उर्वरित 9 लोकांपैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते तसेच 1 संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले होते.

मंगळवारी रात्री नांदेड जिल्ह्यातून 8 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.