नांदुरा ;- नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज फक्त ४३ तास तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालू शकले. दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे तब्बल २४८ तास वाया गेले. विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही.
विरोधी पक्षांच्या वर्तणुकीचा सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी, गुरुवार १२ एप्रिल रोजी नांदुरा तहसील येथे खा. रक्षाताई खडसे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले . याप्रसंगी आमदार चैनसुखजी संचेती, तालुकाध्यक्ष शैलेश मिरगे,
मधुकर वढोदे जिप सदस्य, बंटीभाऊ फणसे कृ उ बा समिती संचालक, अरुण पांडव नांदुरा अर्बन संचालक, रामभाऊ झाम्बरे सूतगिरणी संचालक, रोशन पांडव युवा मोर्चा शहराध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते अमृत बोंबटकर, राजेंद्र खराटे, शंकरराव पाटील, माधवराव गावंडे, गजानन चांभारे युवा मोर्चा, अरविंद किणगे व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी या उपोषणाला नांदूरवासीयांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला