नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्स्प्रेसचे २ डबे घसरले

0

नाशिक : 

नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या डब्याचे चाक तुटल्याने रुळांवरून घसरल्याचा प्रकार घडला आहे. बरेली इथून मुंबईकडे जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसचे दोन डबे नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरले. परिणामी या अपघातामुळे मुंबईकडे येणारी लांबपल्ल्याची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या कामायनी, झेलम, सचखंड, हाटिया एक्स्प्रेस रखडल्या असून उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजरलाही याचा फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.