अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदगाव पेठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्ष व शाल श्रीफळ देऊन हा सन्मान करण्यात आला.
माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या क्रांतिपर्व निमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी हर्षदा बोंडे, ग्रामपंचायतच्या सरपंच कविता डांगे, ग्रामपंचायत सदस्य वृषाली इंगळे सह पत्रकार राजन देशमुख, दिनकर सुंदरकर, मंगेश तायडे सुनील जंजाळकर, सुमित कांबळे, निलेश सरोदे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. मोरेश्वर इंगळे मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी व आभार वर्षा राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी ग्राम पंचायत कर्मचारी राहुल बोडखे, गोपाल शेळके, राहुल भोपळे, रवींद्र भोपळे, नीलिमा शेंडे, वंदना राऊत, रंजना सुंदरकर, मालती देशमुख, जयश्री शेलारे, अर्चना राऊत, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मान्यवर उपस्थित होते.