नव्या मंत्रिमंडळात अमित शहांना मिळणार ‘हे’ खातं !

0

नवी दिल्ली :- नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात घेतली. मागील सरकारमधील ४० टक्के मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. अनेक अनुभवी चेहऱ्यांना यावेळी डच्चू दिला आहे. लवकरच खातेवाटपही होणार आहे. यात कुणाला कोणतं खातं मिळतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना गृह खातं मिळेल, अशी दाट शक्यता आहे. शहा यांना अर्थमंत्रालय हे महत्वाचं खातंही दिलं जाऊ शकतं. राजनाथ सिंह यांना संरक्षण खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. शहा यांना गृहमंत्रालय दिलं तर, अर्थमंत्रालयाची जबाबदारी निर्मला सीतारमण यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.