नवविवाहितेवर सामुहिक बलात्कार, तिघा सावकारांवर गुन्हे

0

कोल्हापूर | प्रतिनिधी
येथील एका सावकाराने नवविवाहित तरुणीवर बलात्कार करुन त्याचा व्हिडीओ शुट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रांच्या साथीने अनेकदा तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन नराधमांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीचा सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील एका तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. घरातून विरोध होत असल्याने दाम्पत्याने कोल्हापुरात भाड्याने खोली घेतली. संसारोपयोगी खर्चासाठी दाम्पत्याला पैशांची गरज भासली. त्यामुळे या तरुणीच्या पतीने 30 हजार रुपये सावकारी कर्ज घेतले होते. कर्जाचे काही हप्ते या तरुणाने फेडले होते. परंतु उर्वरित काही हप्ते भरण्यात दाम्पत्यासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सावकार हे कर्ज वसुल करण्यासाठी दाम्पत्याच्या घरी सतत जाऊ लागला, पती-पत्नीला शिवीगाळ करु लागला, त्यांना मारहाण करु लागला.
एक महिन्यापूर्वी सावकार दाम्पत्याच्या घरी गेला. तरुणीचा पती बाहेर गेला असल्याचे समजतात त्याने तरुणीला महत्त्वाचे काम आहे, असे सांगून बाहेर येऊन मोटारीत बसण्यास सांगितले. तो सावकार तरुणीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी व्हिडीओ शुटही केला. हा व्हिडीओ व्हायरल करेन,अशी धमकी देऊन त्या नराधमाने अनेकवेळा आपल्या मित्रांच्या साथीने तरुणीवर सामुहिक बलात्कार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.