नवविवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.  चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका २० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुम्पा वासुदेव घोराई (वय २०, मुळ रा. कोलकाता) असे विवाहितेचे नाव असून तिने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोलकाता येथील वासुदेव सनद घोराई व तुम्पा यांचा नोंदणी पध्दतीने विवाह झाला होता. आई-वडील चार ते पाच वर्षापासून जळगावात वास्तव्यास असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी ते येथे आले होते. कुटूंबियांकडून विवाहाला होकार मिळाल्यानंतर वासूदेव व तुम्पा यांनी १३ डिसेंबर रोजी लग्न केले.

गुरुवारी रात्री जेवणानंतर वासुदेव व पत्नी झोपले होते. मध्यरात्री वासुदेव यांना लघुशंकेसाठी जाग आली. त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

विवाहितेस जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी किरण पाठक करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.