नवऱ्याच्या छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या

0

बंगळुरू:  प्रसिद्ध कन्नड पार्श्वगायिका सुश्मिथा (वय २६ वर्ष) यांनी त्यांच्या माहेरी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुश्मिथा हिने आत्महत्या करण्यापूर्वी आईला मेसेज पाठवलेला आहे. ”मला छळू नको अशी याचना मी त्याच्याकडे वारंवार करायचे. मी त्याला अनेकदा विनंती केली. मात्र त्यानं अजिबात पर्वा केली नाही. मला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळाली. मला माफ करा. पण त्याला असंच सोडून देऊ नका, असा मेसेज सुश्मिथा यांनी आईला पाठवला असून आपली व्यथा मांडली.

यांच्या आत्महत्येप्रकरणी अन्नपूर्णेश्वरीनगर पोलिसांनी तिचा पती शरथ कुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शरथ कुमार एका खासगी कंपनीत काम करतो. सुश्मिथा यांच्या आत्महत्येनंतर शरथ कुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुश्मिथा यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या मेसेजमध्ये लग्नानंतर सहन कराव्या लागलेल्या छळाचा उल्लेख केला आहे.

‘अम्मा, मला तुझी खूप आठवण येते. माझा लहान भाऊ सचिन तुझी काळजी घेईल याची खात्री आहे. आपल्या गावी माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. सचिन माझ्यावर अंत्यसंस्कार करेल,’ अशी शेवटची इच्छा सुश्मिथा यांनी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये व्यक्त केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.