नवनियुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत

0

खामगांव – मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षक पदी श्री. अरविंद चावरीया हे रुजू झाले आहे. मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांनी बुलडाणा येथे जाऊन जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अरविंद चावरीया यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व आपल्या कारकिर्दीत जिल्ह्यात शांतता, सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून पोलीस हा जनतेचा रक्षक आहे ही प्रतिमा जनमाणसात अधिक दृढ व्हावी अश्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर,खामगांव शहर अल्पसंख्यांक सेलचे बबलु पठाण, बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस तुषार चंदेल यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अरविंद चावरीया यांच्याशी चर्चा करतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगीतले की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. कोरोना संसर्ग रोखणे ही प्रशासनासोबतच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. परंतू अनेक ठिकाणी नागरीक शासनाच्या आदेशाप्रमाणे सामायीक अंतर राखत नाही. ६० टक्के लोक तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरत आहेत. व प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही अनेक व्यवसायीक आपले व्यवसाय सुरु ठेवत आहे ही बाब धक्कादायक असुन कोरोना संसर्ग वाढविणारी आहे म्हणून पोलीस प्रशासनाने शासनाच्या आदेशाप्रमाणे नियम मोडणाNया संबंधीतांविरुध्द दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक आहे असे सानंदा यांनी सांगीतले. तसेच खामगांव मतदार संघात काही भ्रष्ट अधिकाNयांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याबाबत सानंदा यांनी सांगीतले असता अवैध धंद्याबाबत जातीने लक्ष घालून सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद केले जातील असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगीतले. यावेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाNयाच्या ओल्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ चित्रफीत बाबतही चर्चा झाली ही बाब दुर्देवी असून पोलीसांची प्रतिमा मलीन करणारी आहे असे सानंदा यांनी सांगीतले असता याबाबत योग्य ती दखल घेण़्यात येईल असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगीतले.

बुलडाणा हा मातृतिर्थ माँ जिजाऊंचा जिल्हा आहे, आपल्या कारकिर्दीत पोलीस हा जनतेचा रक्षक आहे. हा विश्वास जनतेच्या मनामध्ये अधिक दृढ  व्हावा असे सांगून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.