नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, अनुप्रिया पटेल, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, जेपी नड्डा, गिरीराज सिंह, आरके सिंह, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन सिंह, गजेंद्र सिंह शेखावत यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.