नरेंद्र नारखेडे यांचा पंढरपूर संस्थाकडून विशेष अतिथी म्हणून सन्मान

0

फैजपूर : म सा का संचालक  नरेंद्र नारखेडे यांचा श्री क्षेत्र पंढरपूर येथील मंदिर समिती कडून विशेष अतिथी व देणगीदार म्हणून सन्मान करण्यात आला.

दि दिगंबर वारकरी संस्था चिनावल  या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी श्री  क्षेत्र पंढरपूर येथे यावल रावेर तालुक्यातील भाविकांसाठी भक्त निवासाची  व्यवस्था केलेली आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर संस्था यांनी विशेष अतिथी व देणगीदार म्हणून नरेंद्र नारखेडे यांचा विठ्ठल मंदिर कार्यालयात मंदिर समिती तर्फे  मंदिराचे कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर उपजिल्हाधिकारी  विठ्ठल जोशी यांचे हस्ते शाल, पुष्पहार देऊन

सत्कार झाला यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा  व पु होले सर व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.  तसेच मंदिर परिसरात हनुमान मूर्ती व गरुड मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात नरेंद्र नारखेडे यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.