नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

भुसावळ :-  सिन्नर फाटा येथे आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीने आपली सुटका करून घेत रेल्वेने रात्री १ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशन गाठले. येथे जळगाव  लोहमार्ग पोलिसांनी तिची चौकशी केली असता बापानेच अत्याचार केल्याचा धक्कदायक तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला असून नराधम बापावर भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला तदनंतर  सदर गुन्हा सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

नाशिकमधील सिन्नरफाटा भागातील विष्णूनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिचा पिता व संशयीत आरोपी विक्रम बाबुराव गवळी (वय ४०) याने ७ मे पासून राहत्या घरीच वारंवार अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून पिडीत तरुणीने ९ जून रोजी सायंकाळी एका मैत्रिणीसोबत पळ काढला. डाऊन विदर्भ एक्सप्रेसने ही पिडीता रात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर उतरली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना आपबीती सांगितली. त्यांनी  मुलीला  भुसावळात आणून तीची तक्रार नोंदविली. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी मुलीचा  जबाब नोंदवला. तसेच जळगाव जिल्हा रुग्णालयात तिची वैद्यकिय तपासणी करुन उपचार सुरु आहेत. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.