भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथे वाळू चोरिला मज्जाव घालतांना एका वाळू चोरा कडून महसूल पथकाला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एका वाळू चोरा विरुद्ध तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून वाळू चोरी व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 29 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वडगाव सतीचे गावाजवळ तीतुर नदीपात्रात तहसीलदार सागर ढवळे व यांच्यासोबतच्या महसूल पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीतुर नदीत 744 हे ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली जोडून वाळू वाहत असल्याची बातमीची खात्री करणे साठी उतरले असता त्यांना निळ्या रंगाचे ट्रॅक्टर एक ब्रास वाळू चोरी करताना आढळून आले. त्याला मज्जाव घालण्यासाठी तहसीलदार यांचे पथकातील वाहन चालक विष्णु तायडे, कर्मचारी चेतन राजपूत ट्रॅक्टर स्वरा जवळ जाऊन त्याच्या ट्रॅक्टर ची चावी काढण्यासाठी पुढे गेले असता ट्रॅक्टर स्वरा कडून यांना लाथ मारून दूर हुसकावून लावण्यात आले तर याचं वेळी तिसरे कर्मचारी संदीप बढे हे ट्रॅक्टर चालकास धरण्यासाठी चढले असता त्यांना सुद्धा धक्काबुक्की करून ढकलून दिले. तुम्ही ट्रॅक्टर अडविले तर तुम्हाला सर्वांना ट्रॅक्टर खाली घेऊन मारून टाकले अशी धमकी देऊन सुशीलकुमार पाटील याने रेती भरलेले ट्रॅक्टर पळून घेऊन गेला.
म्हणून याबाबत भडगाव पोलिसात तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुशील कुमार श्रावण पाटील ( रा. वडगाव स्वामींचे ता पाचोरा ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉ. कैलास गीते आहे.
