Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखाची मदत
    जळगाव जिल्हा

    नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखाची मदत

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सततच्या पावसामुळे तसेच घाटावरील सोयगाव बनोटी आदी भागातील  नद्यांचे वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरातून वाट काढत शहरातील कृष्णापुरी मधील आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दि.  २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या धनराज शिंपी (वय  ४०) हा  तरुण  वाहून गेल्याची घटना घडली होती.

    त्याच्या  वारसांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिव कॉलनी मधील युवक देवेंद्र धनराज शिंपी (वय ४०)  हा युवक दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली होती.

    दरम्यान स्थानिक नागरिक व प्रशासनाने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह तब्बल आठवड्याभरानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. सदर युवक रात्री पाऊस जास्त असल्याने व नदीला जास्त पूर असल्याने नदी पार करून जाणे अडचणीचे असल्याने शहरातच रात्री नातेवाईकाकडे मुक्कामी थांबला होता. सकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णपुरी कडे येत असताना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे या युवक पाण्याचया प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.

    दरवर्षी होणाऱ्या अशा घटनांमुळे व स्थानिक नागरिकांना व शहरवासीयांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आ. किशोर  पाटील यांनी याठिकाणी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी आणत परिसरातील तीन पुलांचे काम सुरू केले आहे. मात्र या कामास अजून सुमारे वर्षभर कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. अवघ्या पंधरा दिवसात बाधित कुटुंबाला मदत मिळाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

    तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे मुकुंद बिल्दिकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, जिल्हा उपप्रमुख अॅड. अभय पाटील, नगरसेवक सतिश चेडे, नगरसेवक बापू हटकर, माजी नगरसेवक गंगाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक विकास पाटील, तहसिलदार कैलास चावडे यांच्या हस्ते चार लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

    यावेळी प्रवीण ब्राह्मणे, भूषण पेंढारकर, यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन मुकुंद बिल्दिकर यांनी केले आहे. संततधार पावसामुळे युवक वाहून गेल्याची माहिती मिळताच आमदार किशोर  पाटील यांनी तात्काळ सदर युवकाचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. दरम्यान  सदर युवक सापडून न आल्याने अखेर त्यास मृत गृहीत धरत  मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या होत्या त्या अंतर्गत महसूल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या पंधरा दिवसातच शासकीय मदत मिळाली. यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर. डी. पाटील, लिपीक अमोल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora MLA Kishor Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif