नटराज गार्डन, सिमेंट रस्ता खोदकाम असो वा अन्य प्रकरण

0

खामगाव ऩप़ मुख्याधिकारी अकोटकार ठेकेदारांचे तारणहार

खामगाव-(गणेश भेरडे)

येथील नगर परिषद मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकार ़शासनाचे प्रतिनिधी असले तरी ठेकेदारांचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचा आरोप होत आहे़ नटराज गार्डन सौंदर्यी प्रकरण, नुकत्याच काँंक्रीटीकरण झालेल्या मेनरोडवर विद्युत केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने विना परवानगी केलेले खोदकाम वा अन्य प्रकरणे असो मुख्याधिकारी अकोटकार जणूकाही ठेकेदारांचे तारणहार असल्याचे दिसून येते़
खामगाव नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून रूजू होताच अकोटकार यांनी सर्वप्रथम ठेकेदारांची प्रकरणे निस्तारण्याचे अर्थपूर्ण व महत्वपूर्ण असलेले काम केले, मागील मुख्याधिकाºयांच्या काळात या ना त्या कारणाने अटकलेली बिले त्वरीत काढली़ काही वादग्रस्त कामांची बिले काढण्याचाही त्यांनी प्रयत्न चालविला होता, मात्र तक्रारकर्त्याच्या सतर्कतेने हाणून पाडल्या गेला़ शहराचे जुने वैभव असलेल्या नटराज गार्डन सौंदर्यीकरण काम ठेकेदाराच्या मनमानी काराभारामुळे रखडले होते, ठेकेदाराने झाडाझुडपाने बहरलेल्या या गार्डनमध्ये सिमेंटचे जंगल बांधण्याचा प्रयत्न चालविला होता़ यासाठी चक्क तीनवेळा नकाशे बदलण्यात आले़ मात्र तक्रारी झाल्यानंतर सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत गेले़ शेवटी सत्ताधाºयांनी बहुमताच्या जोरावर चौथा नकाशा मंजूर करून काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला़ यातही ठेकेदारााला सुरूवातीला केलेल्या बांधकामापोटी काही रक्कम अदा करण्यात आली आहे, आता हे बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे़ मात्र यात नपचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असल्याचे बोलले जाते़ सदर प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरूध्द कारवाई करण्याऐवजी प्रकरण निस्तारण्यास मुख्याधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावून छुपा पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे़ आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे, शहरातील भारत कटपीस ते फ रशी या मेनरोडचे कोट्यवधी खर्चुन नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले आहे, परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजुने भूमिगत विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले तसेच रस्त्यावर काही ठिकाणी आडव्या नाल्या खोदण्यात आल्या आहेत़ सदर ठेकेदाराने यासाठी नपची परवानगी घेतली नसल्याचे समजते़ यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी विचारणा करावी तर त्यांचा मोबाईल प्रतिसाद देत नाही़ यावरून मुख्याधिकारी ठेकेदाराची पाठराखण करीत असल्याचे बोलले जात आहे़
वरिष्ठांच्या आदेशाला खो- शहरात नगर परिषदेच्या जागेवर झालेले अतिक्रमण असो वा ठेकेदारने केलेल्या निकृष्ट बांधकामाची तक्रार, यासंदर्भात वरिष्ठांकडून योग्य चौकशी करण्याचे आदेश मिळाले तरी मुख्याधिकारी अतिक्रमणधारक व ठेकेदारांची चांगल्यारितीने पाठराखण करतात आणि वरिष्ठांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसून येते़

Leave A Reply

Your email address will not be published.