नगांव येथे शेतकऱ्याचा मृत्यु

0

पारोळा | प्रतिनिधी

नगांव ता,पारोळा येथील 45 वर्षीय शेतकर्यांचा मृत्यु झाल्याची घटना ता,10 रोजी  घडली. भगवान मुरलीधर पाटील (वय 45 ) हे सकाळी शेतात बेशुध्द अवस्थेत मिळुन आल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी वाहनातुन कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी  तपासुन मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात संदीप मुरलीधर पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.