नगरोत्थान अंर्तगत 50 कोटींच्या कामांना तांत्रीक मान्यता

0

जळगाव | प्रतिनिधी 
नगरोत्थान योजनेंतर्गत मुख्यमंत्री निधीतून 100 कोटीपैकी 50 कोटींच्या विकासकामांना तांत्रीक मान्यता मिळाली  असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली.
नगरोत्थान योजनेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 कोटीच्या निधीतून 50 कोटीच्या विकास कामांना तांत्रीक मान्यता मिळाली आहे. सदर मान्यता हमी पत्रावर देण्यात आली आहे. सदर विकासकामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला 25 लाख रुपये भरावे लागणार आहे.
उर्वरित 50 कोटींची कामे रखडली
नगरोत्थान अंतर्गत 100 कोटीपैकी 50 कोटीच्या कामांना तांत्रीक मान्यता जरी मिळाली असली तरी उर्वरित 50 कोटीच्या कामांना खोडा बसणार आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेनंतर पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यात रस्त्याची तसेच विकासकामे करता येत नाहीत. पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर लगेचच विधानसभेची आचारसंहिता सुरु होणार असल्याने उर्वरित 50 कोटीचे कामे होणे अशक्य असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे निदान 25 कोटीची तरी कामे पदरात पाडून घेण्याकडे प्रशासनाचा कल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.