एरंडोल | प्रतिनिधी
येथे गुरुकुल कॉलनीत संजीवन व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांची कन्या रोहिणी हिच्या वाढदिवसानिमित्त 23 जून 2019 रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते रोप लावून ङ्गग्रीन आर्मी एरंडोलफ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र शिंदे, अमोल जाधव, सैंदाणे, राकेश पाटील, राजू पाटील, देवरे, ङ्गग्रीन आर्मी एरंडोलफ उपक्रमाचे प्रमुख कैलास महाजन, सुधीर शिरसाठ, डॉ. प्रशांत पाटील, पंकज महाजन, रोहिदास पाटील, राजू ठक्कर, गोकुळ पाटील, देवल राजपूत, गोरख वाणी, गोरख पाटील आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.
नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा देत एरंडोल शहर हिरवेगार करण्यासाठी आपण नगरपालिकेतर्फे ङ्गग्रीन आर्मीफ उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासित केले. आर ए शिंदे, रोहिदास पाटील यांची समयोचित भाषणे झाली. ङ्गग्रीन आर्मीफचे प्रमुख कैलास महाजन यांनी केले. सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले शेवटी आभार पंकज महाजन यांनी केले.