अज्ञातांनी केली मध्यरात्री दगडफेक
भुसावळ | प्रतिनिधी
येथील प्रभाग तीन मधील जनाधार विकास पार्टीच्या नगरसेविका सौ .अरुणा विजय सुरवाडे यांच्या दाराशी उभ्या असलेल्या अर्जुनदा गृप च्या रुग्णवाहिनीवर (एम एच ३२-क्यू १६२० ) या गाडीची दिनांक १७ रोजी मध्यरात्री १ ते १ .३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली .घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी धाव घेतली . याबाबत संबंधित रुग्णवाहिका मालक यांची चौकशी करून पाहणी केली . मात्र पोलीस ठाण्यात याबाबत कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आज १८ एप्रिल रोजी उशिरा पर्र्यंत करण्यात आली नव्हती .
भुसावळ शहरात एकापाठोपाठ एक धक्कादायक गुन्हे घडत असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे . खून ,दरोडे , बलात्कार ,चाकु हल्ले , चो-या -घरफोडी ,मंगळसूत्र चोरी ,व्यापा-यावर हल्ला , जुगार-सट्टा पत्ता ,यासह देशी विदेशी गावठी हातभट्टी दारू अड्डे आदी घटनांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन भयभीत झाले आहे .निडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने काही गुन्हेगारीप्रवृत्तीच्या गुंडाविरुद्ध कारवाई काररून त्यांना शहराबाहेर हद्दपारर केले आहे तरीसुद्धा दररोज शहरात एका नवीन गुन्ह्याने डोके वर काढलेले असते . यामुळे अबाल वृद्धांसह नागरिक व महिला संध्यकाळ नंतर घराबाहेर जाण्यास घाबरत आहे . अश्यातच आज रात्री घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे .