नगरसेविका योजना पाटलांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन

0

भडगांव (प्रतिनिधी) :आज वटपोर्णिमा व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरोना व निसर्ग वादळ पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा रक्षक आंगणवाड़ी सेविका यांना यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांनी अर्सेनिक् अल्बम गोळ्या वाटप केल्या.

फिजिकल डिस्टेंट,मास्क,सेनीटायझर वापर बाबत माहिती दिली. वटवृक्षाला दोरा न गुंढाळता वृक्षारोपण,संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.सदर प्रसंगी आंगणवाडी पर्यवेक्षिका के.आर.शिंदे,सेविका संगीता महाजन,प्रतिभा मोरे,कांचन पाटील,लता अहिरे,विजया पाटील,जोत्सना पाटील,सरला महाजन,लता भोई,छाया सोनवणे,अलका मालचे,शैला पाटील,शोभा सूर्यवंशी,उषा जोहरे,विजया पाटील आदी कोरोना योद्धा रक्षक सेविका उपस्थित होत्या.काळजी घ्या सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहनही नगरसेविका योजना पाटील व पर्यवेक्षिका के.आर.शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.