नगरपालिकेची तिरंगा चौकात साफसफाई मोहीम

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेकडून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या नियोजनाने शहरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई मोहीम हातात घेण्यात आली आहे.यात शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या तिरंगा चौकात जेसिबी मशीन द्वारे तेथिल कचरा जमा करूम भरण्यात आला तसेच अग्निशामक गाडीच्या साहाय्याने पाण्याचे फवारे मारून चौकातील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.यात पालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तिरंगा चौक हा शहरातील महत्वाचा चौक असल्याने तेथील सुशोभिकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.स्वच्छतेसोबतच रात्रीच्या वेळी परिसर प्रकाशमय दिसावा यासाठी विद्युत विभागाने देखील काम हाती घेतले आहे.

कचरा न टाकण्याचे आवाहन

तिरंगा चौक हा व्यापारी भागात असल्याने मोठ्या प्रमाणात हातगाडी धारक व इतर व्यापारी त्याठिकाणी कचरा टाकतात अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.नगरपरिषदेकडून या भागात नियमितपणे घंटा गाडी येत असते तरी या ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.