नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदासाठी रमेश नागराणी बिनविरोध

0

भुसावळ (प्रतिनिधी)- नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक  रमेश नागराणी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी असलेल्या तहसीलदार दिपक धिवरे त्यांनी बिनविरोध निवड  जाहीर केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चित्रवार  नगरसेवक युवराज लोणारी,गटनेते मुन्ना तेली, मनोज बियाणी,  राजेंद्र नाटकर,  महेंद्र सिंग ठाकूर, व इतर नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर नूतन उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांचा जळगाव रोडवरील काच बंगल्यात सत्ताधारी गटाच्या नगरसेवक यांनी फुलगाव पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक सुनिल नेवे,मनोज बियाणी,  दिनेश राठी, युवराज लोणारी ,प्रकाश बत्रा,किरण कोलते मा.नगरसेवक राजू सुर्यवंशी,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.