अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात मृत्यदर काही प्रमाणात वाढल्यामुळे स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कारासाठी एकाच वेळी गर्दी होत होती,तसेच स्मशानभूमीत काही प्रमाणात अस्वच्छता पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेला व प्रशासनाला पत्र देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.
याचाच भाग म्हणून अमळनेर नगरपरिषतर्फे पैलाड भागातील स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली. यात जेसिबी च्या साहाय्याने तेथे मोठ्या प्रमाणात असलेली घाण,कचरा ट्रॅक्टर च्या साहाय्याने गोळा करून, तसेच पाण्याच्या टँकर द्वारे संपूर्ण स्मशानभूमी मध्ये पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली.यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी लागलीच दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.