आमदाराच्या मध्यस्थीने मिटला वाद; स्वस्तीक इन्फॉटेक कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे झाला अपघात
पाचोरा प्रतिनिधी
भडगांव तालुक्यातील नगरदेवळा येथील रेल्वेस्टेशन जवळ सुरू असलेल्या अशोका बिल्डकाँनची सब कंपंनी स्वस्तिक इन्फॉटेक तर्फे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे काँक्रेटीकरण सुरू आहे
10 च्या रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास त्याच कामावर असलेला मजुर ड्राइवर माधवराव रामदास पाटील वय – 50 रा.निंभोरा ता. भडगांव हा ट्रँक्टर या वाहनाखाली येऊन गंभिर जखमी झाला असता त्यास ऊपचारार्थ चाळीसगाव येथे नेण्यात आले.
मात्र उपचारा आधीच तो दगावला. त्याच्या अपघाती मृत्युची माहीती कळताच निंभोर्यात संतापाची लाट उसळत सर्व ग्रामस्थांनी स्वस्तिक इन्फॉटेक कंपनीच्या नगरदेवळा स्टेशन येथील डेपोवर जाब विचारत ठिय्या मांडुन स्वस्तीक इन्फॉटेक कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे सदरचा अपघात झाला असल्याची संतप्त भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. दुपारी तीन वाजले तरी शव ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घटनास्थळी काही संतप्त प्रकार घडण्या आधीच आमदार किशोर पाटिल, रावसाहेब पाटील, व सर्व पक्षीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून मयताच्या कुटुंबीयासाठी तातडीची मदत मिळवुन दिली.
घटना स्थळी पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद पठारे, पो.कॉ लक्ष्मण पाटील यांच्या सह होमगार्ड कर्मचारी यांनी सदर घटनेचा पंचनामा करून काही अनर्थ घड्ड नये म्हणुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.