नगरदेवळा येथे राष्ट्रवादीचा मेळावा मोठ्या उत्साहात

0

नगरदेवळा :- जळगाव मतरदारसंघातून राष्ट्रावादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गुलाबराव देवकर यांचे गेल्या दोन दिवसांपासून भडगाव-पाचोरा या ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले होते. १८ रोजी नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात गटातील असंख्य सेना-भाजप कार्यकर्त्यांनी नेरीचे सागर यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच मेळाव्यास उपस्थितीत सर्वांनी आपणास विजयश्री खेचून आणण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्याला माजी आमदार दिलीप वाघ, पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील,प्रवक्ते खालील देशमुख, योगेश देसले, नितीन तावडे, दिनकर जिभाऊ पाटील, शिवा महाजन, डॉ.पी.एन.पाटील, जिप सदस्य संतोष आंबटकर, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, मधुकर पाटील, विलास सोनवणे, पंजाबराव देवकर, भूषण वाघ, मुन्ना परदेशी, अशोक निकुंभ, योगेश महाजन, रवी कोळी, प्रकाश देवरे, सुजित शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्ये व पदाधिकारी उपस्थित होते.

यांनी केला प्रवेश
गटातील वाल्मिक धनगर, सुभास गोसावी, भूषण पाटील, दीपक हिरे, अतुल सूर्यवंशी, अमोल पाटील, राहुल पाटील, रोहित भालेराव, हरीश गोसावी, विलास पाटील, राहू भालेराव, दशरथ भालेराव, संदीप पाटील, स्वप्नील पाटील यांचा सह इतरांनी प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.