पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नगरदेवळा येथील अग्नावती मध्यम प्रकल्पात मागील वर्षाचा शिल्लक जलसाठा तसेच यंदा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नगरदेवळा गावाचा मुख्य जलस्रोत असलेला अग्नावती मध्यम प्रकल्प यावर्षी जुलै महिन्यातच संपूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे.
धरण सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गावातील मुख्य पेयजल समस्येचे निवारणही दरवर्षा प्रमाणे झाले आहे.. दि. २० जुलै रोजी झालेल्या पावसाने धरण ओसंडून वाहत असून नगरदेवळा अग्नावती नदी पात्रातील दुकाने, संगमेश्वर, होळ, सांघवी, वडगाव व आसपासच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असुन कोणीही व्यक्ती तसेच शेतकरी बांधवांनी आपली गुरे – ढोरे पाण्याच्या प्रवाहात नेवू नये असे आवाहन अभियंता श्री. मोरे यांनी केले आहे.

