नऊ शिल्पांद्वारे होणार अमळनेर शहराचे सुशोभिकरण!

0

सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा प्रसिद्ध

जळगाव दि. 21-
सानेगुरुजींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अमळनेर शहराचे सुशोभिकरण होणार आहे. शहरातील प्रमुख चौकांत विविध विषयांवरील नऊ शिल्पे साकारण्यात येणार आहेत. याबाबत इच्छुक शिल्पकार, सल्लागार, उत्पादक, वितरक, विक्रेता यांच्याकडून शिल्पांसाठी विशेष बाबीकरिता मोहरबंद लिफाफ्यात दरपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नुकतीच मागविण्यात आली आहेत.
शौर्य, अध्यात्म, विकास, शेती आदींवर साकारणार शिल्पे
अमळनेर शहरातील विविध चौक विकसित करण्यात येवून नऊ चौकात अभ्यास, शौर्य, अध्यात्म, विकास, शेती आदी विषयांवर नऊ शिल्पे साकारण्यात येणार आहेत. शिल्पात आई मुलाचा अभ्यास घेत आहे. बाजुला पुस्तकांचा गठ्ठा आहे. हे शिल्प मॅटेलिक कलर फायबरमध्ये बनविण्यात येणार आहे. शेतकरी व दळणवळणाचा विकास यात कृषी उत्पन्न बाजार समितीची कमान नांगरधारी शेतकरी, बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉलीसह शिल्प मॅटेलीक ब्रॉन्झ कलरमध्ये राहणार आहे. कॉलेज बॉईज व सायकलस्वाराच्या शिल्पात सायकलवर जाणारी तीन मुले व येणारी मुलगी, स्वच्छता अभियानात स्वच्छता करणारा माणूस गांधीजींचा चष्मा मेटलमध्ये त्याच्याखाली स्वच्छतेची अवजारे खराटा, झाडू पाटी, फावडे आदी. शुरविरांच्या शिल्पात महाराणा प्रताप व त्यांचा चेतक नावाचा अश्व, वारी आणि जत्रेच्या शिल्पात रिंगण घालणारा माऊलींचा अश्व व वारी दाखविण्यात येईल. शहराचा विकास यात प्रताप कॉलेज, सानेगुरुजी, प्रताप मिल, मेक इन इंडियाचा लायन, विप्रो कंपनीचा लोगो, कॉलेजला जाणारी मुले, शहराचा विकास आदी जवानभूमी त्यात सुभाषबाबूंचे शिल्प, विहिर त्याच्या बाजूला बंदूकधारी सैनिक, शहिद जवानांची नावे, दुसर्‍या बाजूला जहा पिणारा माणूस तर सेल्फी प्वॉईंट व व्हिन्टेज ट्रेनमध्ये जुन्या काळातील रेल्वे दोन डबे, दुसर्‍या बाजूला विचारमग्न तत्ववेत्ता त्याबाजूला कॅमेरा घेवून फोटो काढणारा व्यक्ती त्याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी जागा असावी, अशी नऊ शिल्पे साकारण्यात येणार आहेत. तसेच शिल्पांची वाहतूक, चढवणे- उतरविणे व उभारण्यासाठी येणारा खर्चदर निविदेत नमूद असावा, असेही निविदेत म्हटले आहे.
सदरहू निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांना आवाहन करण्यात आले आहे. या निविदेबाबत अधिक माहिती www.mahapwd.com वर उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.