आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
भडगाव – शहरात दि. 22 -3 -2019 रोजी येथील टोणगाव भागातील रहिवाशी व 9 वर्षीय बालक इसम बब्बू सय्यद याचा पाचोरा रस्त्यावरील रजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या मागे अनैसर्गिक कृत्य करून खून करण्यात आला होता. याबाबत भडगाव पोलिस स्टेशन ला गु.र. न. 103/2019 भा. द. वी. कलम 302,377 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी शहरासह परिसरातून अहोरात्र कसून चौकशी सुरु असून भडगाव पोलिसांनी आज संशयित आरोपीचे रेखाचित्र(स्केच) जारी करण्यात आले असून सदर रेखाचित्र मधील संशयित आरोपी कुणालाही आढळल्यास त्याने भडगाव पोलिस स्टेशन (02596213333) या नंबर वर संपर्क साधावा. या बाबत माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. व त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले असल्याचे भडगाव पोलिस निरीक्षक श्री. धनंजय येरुळे यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले.