Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नंदुरबार पालिकेत सत्ताधारी -विरोधक भिडले
    ताज्या बातम्या

    नंदुरबार पालिकेत सत्ताधारी -विरोधक भिडले

    By April 3, 2018No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नगरसेविकेच्या पतीचे डोके फुटले ;आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक 
    शहरात तणावपूर्ण शांतता
    नंदुरबार:– पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयांचे वाचन सविस्तर करावे, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केल्यानंतर वाद उफाळल्याने सत्ताधार व विरोधक समोरा-समोर भिडले तर या प्रकारात नगरसेविका संगीता सोनवणे यांच्या पतीच्या मारहाण झाल्याने त्यांचे डोके फुटल्याने त्यांना जबर दुखापत झाली. या प्रकारानंतर सभागृहाबाहेर दोन्ही गटातील नगरसेवक व समर्थक भिडल्याने शहरात दंगलीची अफवा पसरली.


    जमावाने परदेशीपूरा भागातील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयावर दगडफेक व बाटल्या फेकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर आमदारांच्या निवासस्थानाभोवती कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
    या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी काही तरुण सभागृहात शिरले. त्यामुळे वाद जास्तच चिघळला. त्यामुळे सभागृहात सुरु असलेला हा दांगडो सभागृहाबाहेर आला.पालिकेच्या आवारातदेखील पुन्हा हाणामारी झाली. या हाणामारीत एका नगरसेविकेचा पती जखमी झाला आहे. या हाणामारीमुळे गावात पळापळ सुरु झाली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांचे शटर लावले. यावेळी आमदार कार्यालय परिसरात दगडफेक व काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या.
    पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पोलीस कुमक दाखल झाली. मात्र, पोलीसांसमोरही हा दांगडो सुरुच होता. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    शहरात अफवांना ऊत
    मंगळवारी शहराचा बाजार असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरीक शहरात आले होते मात्र शहरात दंगल पसरल्याच्या अफवेने अनेकांनी मिळेल त्या वाहनाने घरचा रस्ता धरला तर शहरातील सराफा बाजार, नगरपालिका परीसरातील व्यापार्‍यांनी अप्रिय घटनेच्या भीतीने दुकाने पटापट बंद केली. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू, शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif