धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील इसमाचा मृत्यू

0

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील ४३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी असोदा रेल्वे डाऊन लाईनवर घडली. दरम्यान, याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुधिर बळीराम अडकमोल (वय ४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ते आज सकाळी रेल्वेने जळगाववरून भुसावळला जात असतांना त्यांचा असोदा रेल्वे डाऊन लाईन खांबा क्र.४२२/ १३ ते १५ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला आहे. अडकमोल यांच्या खिशात जळगाव – भुसावळ तिकीट आढळले आहे. दरम्यान, अडकमोल हे पेंटर काम करत असुन ते कामाला जात होते असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

याबाबत जळगाव स्टेशन मास्टर यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अडकमोल यांच्या पाश्च्यात आई, पत्नी, ३ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पो.काँ.साहेबराव पाटील.व.सोनार हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.