धावत्या रेल्वेखाली येवून तरुण जागीच ठार ; मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

0

जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ३ वर एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली येवून जागीच ठार झाल्याचे  आज २५ मार्च रोजी सकाळी आढळून आले आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ च्या डाऊन रेल्वे लाईन खंबा क्रमांक ४१९/१७ ते १९ दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी पुरूषाचा धावत्या रेल्वे खाली आल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा होवून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. शरीर मध्यमबांधा, हातावर ओम गोंदलेले असून डावा हाताच्या पंजावर राम गोंदलेले आहे. गळ्यात तुळशीची माळ, पिवळ्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅट अशी मयताचे वर्णन आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी जळगाव रेल्वे पोलीस दुरक्षेत्र पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.