Saturday, October 1, 2022

धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील खंडेराव नगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सुरेश नामदेव महाले (वय ३५, रा. सोयगाव जि. औरंगाबाद ह.मु. खंडेराव नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सुरेश महाले हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार १३ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून ते घरबाहेर पडले. नंतर सुरेश महाले यांनी खंडेराव नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मृतदेह जळगाव शिरसोली दरम्यान खंबा क्रमांक ४१६/२५ ते २७ दरम्यानच्या डाऊन रेल्वेरूळावर आढळून आला या संदर्भात उपस्टेशन प्रबंधक अमरचंद मुलचंद अग्रवाल यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लालसिंग बारेला तपास करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्या पश्चात पत्नी ललिताबाई व शितल, पुजा, सुप्रिया ह्या तीन मुली असा परिवार आहे. महाले हे सेट्रींग काम करुन उदरनिर्वाह करीत होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या