Thursday, February 2, 2023

धावत्या रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज धावत्या रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रेमनगरजवळच्या लक्ष्मणनगरातील रहिवाशी संजय वसंत खडके (वय ५६) हे आज नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला घराबाहेर पडले होते. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते रेल्वे पटरी ओलांडत असताना रेल्वेगाडी त्याचवेळी येत आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. या रेल्वेखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती रेल्वेचे अधिकारी सचिन भावसार यांनी स्थानिक पोलिसांना दिली. संजय खडके यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे