Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

    तालुक्यातील खडकदेवळा गावाजवळील दुर्दैवी घटना

     

    पाचोरा प्रतिनिधी

    धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने एक ३९ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडकदेवळा गावा जवळ १२ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सरुबाई भिकन पाटील (वय – ३९ वर्ष) रा. सारोळा ता. पाचोरा असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सरुबाई पाटील ह्या पती भिकन पाटील यांचेसह छत्रपती संभाजी नगर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी गेल्या होत्या.

    दरम्यान १२ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर येथुन आपल्या सारोळा या गावी येत असतांनाच खडकदेवळा गावाजवळ रस्त्यांची झालेली दुरावस्था यात मोटरसायकलवर मागे बसलेल्या सरुबाई पाटील यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या व त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास खरे हे करीत आहे. मयत सरुबाई पाटील यांचे पाश्चात्य पती, तीन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या सरुबाई पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने सारोळा सह परिसरात शोककळा पसरली आहे.

    #crime #pachora accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif