थांबा नसतानाही पाचोऱ्यात गाडी थांबवली : मातेसह बाळही सुखरूप
पाचोरा :- मुंबई येथुन उत्तर प्रदेशासाठी रेल्वेने प्रवास करणारी एका गरोदर महिला प्रसूत झाली. धावत्या गाडीमध्येच पोटात दुखायला लागले होते. मात्र रेल्वे सुपर फास्ट गाडी पाचोरा स्थानकावर ही एक्प्रेस थांबवून सदर महिलेला पाचोराश शहरातील देशमुखवाडी भागांतील इंडियन एस.एस.ग्रुपचे शरद युवराज पाटील, सुमित रवींद्र सावंत, बबलू सिनकर वीर मराठा मावळा संघटनेचे सचिन पाटील यांनी गजानन हॉस्पिटल मधील सिस्टर सुलताना बेन यांना सोबत घेऊन प्रसूती करण्यासाठी पाचोरा रुग्णालयात दाखल करून उपचार करून प्रसूती करण्यासाठी यश मिळवले प्रसूती झालेली महिला व बाळ सुखरूप असल्याने देव मातीतच नाही तर माणसातही असतो असे हे कार्य शरद युवराज पाटील व सुमित रवींद्र सावंत यांनी करून दाखवलं आहे त्या महिलेला गाडीतच भयंकर प्रसुती वेदना सुरू झाल्या. बोगीतील अन्य प्रवासी महिलांना माहिती दिली होती मात्र गाडी वेगात असल्याने काही पर्याय न्हवता गाडीतील प्रवाशांनी चेईन पुलींग करून सुपर फास्ट एक्स्प्रेस थांबवली होती. या केलेल्या कार्याला इंडियन एस. एस. ग्रुपचे शरद युवराज पाटील व सुमित रवींद्र सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे या माणुसकी कार्यायामुळे मुळे शहरातुन या तरूणांचे कौतुक होत.