मुंबई :- धारावी परिसरात पीएमजीपी कॉलनीमधील बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Spot visuals: 1 dead & 3 injured after a portion of an under-construction building collapsed in Dharavi's PMGP colony in Mumbai. Injured have been shifted to hospital. #Maharashtra pic.twitter.com/x8Ci7Yh1Re
— ANI (@ANI) April 14, 2019
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा पाईप खालून जात असलेल्या रिक्षावर कोसळला. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तिथून बाईकवरुन जाणारी एक व्यक्ती सुद्धा या दुर्घटनेत जखमी झाली. त्यांना आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असे पीएमजीपी कॉलनीचे रहिवाशी नईम कुरेशी यांनी सांगितले.