धाबे येथे ‘दै. लोकशाही’च्या ‘लोकशिक्षा’ विशेषांकाचे प्रकाशन

0

लोकशिक्षा विशेषांक ठरला पालक, शाळा, शिक्षक व विदयार्थ्यांसाठी प्रेरक

पारोळा :- तालुक्यातील धाबे येथे आज दैनिक लोकशाही वृत्तपत्राच्या लोकशिक्षा विशेषांकाचे जि. प. प्राथमिक शाळेत व गावात उत्साहात प्रकाशन व प्रदर्शन करण्यात आले. लोकशिक्षा विशेषांक अतिशय सुबक, सुंदर व वाचनिय झाला असुन पालक, विदयार्थी, शाळा व शिक्षक यांच्या दृष्टीने खुपच महत्वाचा ठरला आहे. शाळेचे राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक तथा पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील, उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भुषण पाटील, अंगणवाडी सेविका सुलोचना साळुंखे, युवा कार्यकर्ता किरण राजपूत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल, वीर एकलव्य बजरंग ग्रुपचे अध्यक्ष रविंद्र भिल यांच्यासह सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेतील शिक्षकांनी विदयार्थ्यांना अंकात प्रसिद्ध झालेली ज्ञानार्जनाबरोबरच विदयार्थ्यांनो सुसंस्कारित आदर्श व्यक्ती बना, शिक्षण म्हणजे ज्ञान आणि सुसंस्कार, गरज मुल्य शिक्षणाची हे विदयार्थ्याना उपयुक्त लेख वाचुन दाखविले व वाचनासाठीही दिले. तसेच ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्व व जिल्हयातील काही शाळा, संस्था व शिक्षक शिक्षणाच्या बाबतीत करीत असलेले प्रयत्न स्पष्ट केले.

यावेळी मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले की चांगले व उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्था, शाळा व शिक्षक यांचे कौतुक केले गेले पाहिजे. त्यांचे कार्य समाजासमोर मांडले गेले पाहिजे. दै लोकशाहीने लोकशिक्षा हा याबाबत विशेषांक प्रसिद्ध करुन स्तुत्य कार्य केले आहे. दै लोकशाही सुंदर, छान, सुबक, वाचनाचा आनंद देणारे, समाजाभिमुख व गुणग्राहकता जोपासणारे वृत्तपत्र असुन मी त्याचा वार्षिक वर्गणीदार असुन नित्य वाचक आहे. दैनिकात प्रसिद्ध शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक व खेळांची माहिती नेहमी विदयार्थ्यासमोर मांडतो. दैनिकाचे पारोळा तालुका प्रतिनिधी अशोककुमार लालवानी हे कार्यतत्पर व गुणग्राहक आहेत. योग्य अयोग्याला न्याय देणारे असुन आजही त्यांनी लोकशिक्षा विशेषांक पंचायत समिती पारोळा, शिक्षण विभाग गट साधन केंद्र, केंद्र प्रमुख, काही शिक्षण केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शाळा, संस्था, शिक्षक व विदयार्थ्यांना माहितीसाठी उपलब्ध करुन दिले.

दै लोकशाहीने लोकशिक्षा हा शैक्षणिक विशेषांक प्रसिद्ध केला त्याबद्दल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पारोळा चंद्रकांत चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले, कायॅक्रमा च्या शेवटी लोकशाही पारोळा तालुका प्रतिनिधी अशोक कुमार लालवानी यांनी सवाॅचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.