धानो-यात दिवसातुन ४० वेळा वीजपुरवठा खंडीत

0

धानोरा : चोपडा तालुक्यातील धानोरा गावात दिवसभरात तब्बल ४० वेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे.गेल्या आठवड्यापासुन वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.याबाबत स्थानिक कार्यालयात फोन लावले असता नेहमीप्रमाणे व्यस्त असतो.काही वेळा येथिल कर्मचारीच हातात फोन घेऊन फोन येताच बरोबर कट करुन देतात.यामुळे वीजेच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.४० अंशावर तापमान स्थिर आहे.उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन त्यात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करत आहे.लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे.

येथिल कार्यालयात शिकाऊ कारागिर असल्याने ते आपली मनमानी चालवतात.तसेच येथिल वीज अभियंता पद सध्या प्रभारी अधिकारी यांच्यावर असल्याने वरीष्ठ अधिका-यांचा वचक नसल्याने कोण काय करत आहे,याबाबत माहीती ग्रामस्थांना मिळत नाही.शेतकरी वर्गातुनही नाराजीचा सुर उमटत आहे.
सध्या हम जो करे सो कायदा असे हे कर्मचारी वावरतांना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.