धानो-याती तरुणांच्या मदतीने कोरोणा-19 लसीकरणास नोंदणीसाठी मद्दत

0

धानो-यातील  प्रार्थमिक आरोग्य केंद्रात  लसीकरण रिजीस्ट्रेशन समस्या येत आल्यामुळे तरुणांनी घेतला पुढाकार….

धानोरा!प्रतिनीधी

प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला  नेटवर्क समस्या मुळे खूप वेळ लागत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या

तांत्रिक अडचणी मुळे वयोवृद्ध नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, पं स सदस्या कल्पना पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले, समस्येवर चर्चा करून स्थानिक युवा स्वयंसेवक चंद्रशेखर दिनकर चौधरी, उद्धव महाजन, प्रीतम  महाजन, प्रसाद  महाजन यांच्या लॅपटॉप वरून लसीकरण नोंदणी/रजिस्ट्रेशन करण्यास मदत  सुरू केली.परिणामस्वरूप लसीकरण लवकर होऊ लागले. आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन व कौतुक केले.

प्रार्थमिक आरोग्य केंद्र धानोरा डॉ उमेश कवडीवाले सह सर्व स्टॉफ मेहनत घेत आहेत. भिकुबाई बोदडे, कुशलतेने लस देत आहेत. रजिस्ट्रेशन राहुल सोनवणे,भारती सोनवणे,एलिझा मोरे, हे करीत आहेत.त्यांना व्ही टी महाजन,एम डी माळी, विलास पवार,औषधी निर्माता मोनाली पाटील,दिपा महाजन,नितीन महाजन, प्रवीण पाटील ,आशा वर्कर प्रमुख करुणा चौधरी व सर्व आशा वर्कर मदत करीत आहेत.

असे आहे लसीकरण…..

वय वर्ष 45- 60 पेक्षा जास्त वय असलेल्या स्री/पुरुषांनी लवकर पहिली लस घ्यावी.दुसरी लस पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी आपण घ्यायची आहे. जातांना सोबत आधारकार्ड झेरॉक्स त्यावर आपला मोबाइल नंबर लीहुन द्यावा.काहींना आधार कार्ड लिंक करतांना अडचण येत असते म्हणून सोबत मतदान कार्ड असू द्यावे. ज्यांचे वय 45 ते 60 वर्षातील आहे अशा स्री/पुरुषांपैकी एखाद्या आजाराचे ट्रीटमेंट घेत असलेली व्यक्ती लस घेऊ शकतात. अशा लोकांनी आधारकार्ड सोबत डॉक्टरांचा अर्ज फॅमिली डॉक्टरां कडून सही शिक्का मारलेला अर्ज जोडावा.

Leave A Reply

Your email address will not be published.