धानोरा | -प्रतिनिधी विलास सोनवणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातंर्गत प्रत्येक गाव आणि घराघरात शौचालय उभारणीसाठी अभियान सुरू केले आहे.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे. जि.प.जळगाव मार्फत लावण्यात आलेले फलकावरुन गावात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
धानो-या गावात खासगी शौचालयाचा मोठ्या प्रमाणात असून गाव कागदोपत्री ७० % शौचालय आहे, सार्वजनिक शौचालयाचीही दुरावस्था झाल्याने या गावातील महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. धानोरा गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 17 असून गावाची लोकसंख्या १५ हजारापर्यंत आहे.मात्र असे असूनही या गावात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.यामध्ये सर्वाधिक गावातील अस्वस्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
.तसेच गावातील बहुतांश नागरीकांकडे खासगी जागा नसल्याने त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहीवास सुरू केला आहे.यामूळे अशा नागरीकांना घरकुल व वैयक्तीक शौचालयाचा लाभ मिळणे दुरापस्त झाले आहे.यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय उभारले आहे.मात्र या सार्वजनिक शौचालयाची गत दिड ते दोन वर्षापासुन ग्रामपंचायतीचे देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.परीणामी नागरीकांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा प्रकार निंदणीय असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक शौचालयात अस्वच्छता
ग्रामपंचायतीच्या देखभाली अभावी सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.तसेच शौचालय व परीसरात अस्वच्छतेचा वेढा पडल्याने महीला शौचालयाचा वापर करण्यास धजावत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला या गावात तिलांजली देण्यासारखा प्रकार दिसून येत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धानोरा ग्रामपंचायत हद्दीचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महामार्गावरील विस्तारीत वाढत आहे.अशा विविध भागांचा समावेश होतो. गावात एक पुरुष व एक महिला कर्मचार्यांरी असतांना स्वच्छतेची मदार केवळ तात्पुरता कर्मचार्यांवर अवलंबून आहे. तेही धानोरा गाव हे मोठे असल्या कारणाने येथे कर्मचारीचा तुटवळा असल्याचे समजते.यामूळे गावातील व विस्तारीत भागातील स्वच्छतेचा प्रश्न मोठा जटील बनत आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गुड मार्निंग पथकही झाले गायब…
गावात जागेअभावी बहुतांश नागरीकांकडे वैयक्तीक शौचालय नसल्याने अनेक पुरूष व महीलांना उघड्यावर शौचास जावे लागते. हा प्रकार बंद करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे हगणदारी मुक्त करण्यासाठी गुड मार्निंग पथकाची स्थापना करून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून उघड्यावर शौचास बसणार्या व्यक्तींचा गुलाबपुष्प देवून सत्काराची मोहीम राबवली होती.याच प्रकारे हे पथक मनवेल गावात आले असता तेथील उघड्यावर शौचास बसणार्या एका व्यक्तीचा सत्कार केला असता त्याने माझे कडे जागा नसल्याने शौचालय बांधू कुठे असा प्रश्न पथकाला केला.यामूळे गुड मार्निंग पथकही हतबल झाले होते.
गावात स्वच्छता कर्मचार्यांची तोडकी संख्या व ग्रामपंचायत धानो-यात ग्रामसेवक टिकेना – आणि टिकलातर मनमाणिकारभार!
धानोरा ग्रामपंचायत हद्दीचा मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतीमध्ये विस्तार झाला आहे.यामूळे या ग्रामंपचायतीचे बर्यापैकी उत्पन्न आहे.मात्र असे असूनही गावातील राजकीय खेळीमूळे या ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामसेवक जास्त दिवस टिकत नसल्याने गावातील विकास कामांना खिळ बसली होती तार आता धानो-यागावाला एक ग्रामसेवक मिळाला असुन सरपंच व ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरु असल्याची चर्चाच नवे तर बोलले जाते.या मुळे सुज्ञ नागरीकांमध्ये होत असते.याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. जळगाव जि.प.मार्फत स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी ठेकेदार मार्फत टिम गावात फीरत आहे. गावात महिलांच्या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे.अन हागणदारी मुक्त गावांचे फलक लावण्यात आल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.