धानोरा (प्रतिनिधी) : धानोरा तालुका चोपडा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात १५ ते ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली असून या काळात संचारबंदीचे नियम मोडून बेशिस्त फिरणार्यांवर व गर्दीच्या ठिकाणी अडावद पोलीस स्टेशन व आरोग्य विभागाच्या वतीने १२० जणांची एंटीजन तपासणी करण्यात आली असून या दोन कोरोना बाधित मिळून आले आहेत.
धानोरा सह परिसर सध्या कोरोना हॉटस्पॉट ठरत असून प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजस कोरोना बाधितांची तपासणी सुरू आहे. यात रोजच कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून त्यातच गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधित पांच रुग्णांचा मृत्यू झाल्याने धानोरासह परिसरात ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. धानोरा हे आठवडे बाजाराचे गाव असून दर गुरुवारी बाजार भरतो. मात्र सध्या संचारबंदी सुरू असल्याने आठवडे बाजार बंद असला तरी देखील धानोरा येथे गुरुवारी बाजार करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे. त्याच अनुषंगाने अडावद पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्ण शोधण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान वैद्यकीय अधिकारी उमेश कवडी वाले, व त्यांचा संपूर्ण व अडावद पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश घायदळ,एसआयपी जगदीश कोळंबे,गोपनीय विभागाचे योगेश गोसावी,गृहरक्षक दलाचे मच्छिंद्र महाजन, मनोज माळी, मनोज पाटील, सुनिता बारेला धानोरासह परिसरावर नजर ठेवून होते. दि.२१ एप्रिल रोजी पोलिसांनी व आरोग्य विभागाने धानोरा येथील वर्दळीच्या परिसरात कुठेही कारण नसतांना फिरणाऱ्या रिकामटेकळ्यांची व बाहेरगावहुन येणाऱ्या जाणाऱ्या तसेच जेडीसीसी बँक, सेंट्रल बँक मध्ये व चोपडा,यावल,जळगांव टि पाँईटवर गर्दी करणाऱ्या १२० जणांची एंटीजन तपासणी करण्यात येऊन यात दोन कोरोना बाधित मिळून आलेत.यात चोपडा,यावल,जळगांव टि पाँईटवर एक तर जेडीसीसी बँक मधील गर्दीत एक कोरोना पाँझिटीव आढळुन आला.
या अँटीजन तपासणीच्या धडक मोहिमेची धडकी ग्रामस्थांनी घेतली असून दुपारपासून धानोरा शुकशुकाट दिसत होता. मात्र संध्याकाळी पाच नंतर होणाऱ्या गर्दीवर देखील असाच जालिम उपाय केला जावा जेणे घराबाहेर पडणारे रिकामटेकड्यांवर वचक बसेल अशी ही चर्चा गावातील सुज्ञ ग्रामस्थांमधून होतांना दिसत होती.