Saturday, December 3, 2022

धर्माबाद शहरातील विनापरवाना मुरूम वाहतूक करणा-या चार हायवा ट्रिपरवर कार्यवाही

- Advertisement -

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील धर्माबाद शहरालगत असलेल्या खदाणीतून शासनाची रॉयल्टी न भरता रात्रीच्या वेळी मुरूम उतखनन करून वाहतूक करणारी  4 हायवा टिपर शिवसैनिकानी पकडली असल्याने काल सायंकाळी ती वाहने तहसील कार्यालयात जमा करून पंचनामा करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यात अवैध वाळू व मुरूम वाहतुकीवर महसूल विभागाच्या वतीने सातत्याने कार्यवाही करूनही मोठया प्रमाणावर उतखनन व वाहतूक चालूच आहे.

- Advertisement -

- Advertisement -

16 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता शासनाची कोणतीही परवानगी नसताना मुरूम उतखनन करून वाहतूक करणारी 4 हायवा शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी,शहरप्रमुख आणील कमलाकर, साईप्रसाद पेकमवार व मनसेचे सतिष माळगे यांनी ही वाहने पकडुन प्रशासनाच्या स्वाधीन केले तद्नंतर तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्या आदेशानुसार तलाठी सहदेव बासरे यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.

उपरोक्त वाहनाद्वारे ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले त्याचीही ईटीएस मोजणी करून  संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेनेचे गणेश गिरी ,आणील कमलाकर यांनी केली आहे

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या