धरणगाव – जगात व देशात कोविड – 19 मुळे हाहाकार माजला आहे.सर्व जग कोरोना विषाणूशी.लढा देत आहे. महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परिस्थिती ची गांभीर्याने घेवुन राज्यात ३० एप्रिल पर्यत लॉक डाऊन केला आहे.या मुळे गोरगरीब,कष्टकरी,कामगार वर्ग घरी बसून आहे.त्यांच्या कडील अन्न -धान्य संपले आहे. किराणा संपला आहे.अन्न मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर महिला धरणगांव शिवसेना महिला आघाडी धरणगाव यांच्यातर्फे धारणगावातील सेवा वस्तीतअन्नदान करण्यात आले.
सर्व समाजावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणुन केलेल्या मदतीने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी उपस्थितशिवसेना मा.नगराध्यक्ष ऊषाताई गुलाबराव वाघ, मा. उपनगराध्यक्ष अंजलीताई भानूदास विसावे , सुरेखाताई विजय महाजन, नगरसेविका कल्पना ताई विलास महाजन , नगरसेविका आराधनाताई नंदकिशोर पाटिल , कीर्तीताई किरण मराठे नगरसेविका मंदाताई जितेंद्र धनगर , हेमांगिताताई किरण अग्निहोत्री , भारतीताई हेमंत चौधरी , कु.नेहा पी.एम. पाटिल , मोनालीताई योगेश पाटील , गोरख भाऊ रामा महाजन , हर्षल गुलाबराव वाघ, बंटी भाऊ महाजन, किरण भाऊ अग्निहोत्री, नंदकिशोर पाटील, हेमंत भाऊ चौधरी , पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.