शिवसेना जिल्हा प्रमुख वाघांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना पंजा
धरणगाव :- केंद्रांत २०१४ मध्ये एनडीए म्हणजेच मोदी सरकार बहुमताने सतेत आली. यावेळी मोदी सरकारकडून विविध योजना राबविण्यात आल्या. त्यात मोदी सरकारने २०२२पर्यत भारत देश झोपडपट्टी मुक्तचे स्वप्न पाहिले होते. परत पुन्हा २०१९साली जनतेने दुसऱ्यांदा या योजनेचा जोरावर मोदी सरकार बसविले. परंतु धरणगाव शहरात अजूनही या योजनेचा एक ही लाभार्थी नाही आहे. गेले दोन वर्षपासून धरणगाव शहरात सर्वे करून गर्जून कडून अर्ज मागविण्यात आले. त्यातील फक्त १५० जणांची पहिली यादी जाहीर झाली. यांत पात्र नागरिकानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्याकडे तक्रार दिली. त्यात त्यांनी लाभार्थीचा प्लॅनसाठी १५००रु घेऊन प्लॅन मजूर सुद्धा झाले आहे. संपुर्ण कागदपत्रांची फाईल जमा झाली आहे. याठिकाणी फाईल जमा करण्यासाठी आल्यावर मॅडम नाही आहे असे सांगितले जाते. ही सर्व कैफियत शिवसेना पदाधिकारी सांगितले वर न.पा.बांधकाम इंजिनीयर यांना आवास योजनेत कामचुकार अधिकाऱ्यास चांगलेच धारेवर धरले.
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते पप्पू भावे, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, विजय महाजन, शरद पाटील, सुरेश महाजन, अजय चव्हाण, नंदू पाटील, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी, तौसीफ पटेल, किशोर माळी, राहुल रोकडे, विनोद रोकडे, जयेश महाजन, हिरालाल महाजन, भैय्या महाजन, कल्पेश रोकडे उपस्थित होते.